बालाजी देशमुख करणार आझाद मैदानावर आमरण उपोषण..

Khozmaster
2 Min Read
ठाणेदार  रविंद्र हुंडेकर यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
     कार्यालय, प्रतिनिधी  हिंगोली जिल्ह्यातील केंद्रा खुर्द गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या सिंचन विहीर घोटाळा प्रकरणात एक कोटी रुपयांच्या वर भ्रष्टाचार झाला असल्याचा कारणावरून बालाजी देशमुख तसेच केंद्रा खुर्द येथील रहिवासी सरपंच यांनी विहिरीवर आमरण उपोषण सुरू केले असताना ठाणेदार रवींद्र हुंडेकर यांनी संबंधित कंत्राटदार पुढारी यांच्याशी संगणमत करून बालाजी देशमुख यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे खंडणीची मागणी करणे दरोडा ट अशा प्रकारच्या विविध बनावट कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याचे निवेदन बालाजी देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सादर केले आहे.
            याबाबत सविस्तर असे की केंद्रा खुर्द येथील जल जीवन मिशन कामांतर्गत मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याचा कारणाने बालाजी देशमुख यांच्या समवेत गावकरी सिंचन विहिरीवरच उपोषणाला बसले होते. त्यामुळे भगवान बाबा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरचा राग अनावर होऊन त्यांनी तेथील एपीआय रवींद्र हुंडेकर यांच्याशी संगणमत करून बालाजी देशमुख यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. निवेदनात नमूद आशयानुसार बालाजी देशमुख यांनी एपीआय हुंडेकर यांची पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार सुद्धा यापूर्वी केली होती त्यामुळे याच संदर्भाचा राग मनात ठेवून एपीआय हुंडेकर यांनी त्यांच्याविरुद्ध गंभीर कलमाचा वापर करत गुन्हे दाखल करून त्यांना मानसिक शारीरिक छळ करून तुरुंगवासात पाठवले. त्यामुळे वरील कॉन्ट्रॅक्टदार तसेच ठाणेदार यांची निष्पक्ष चौकशी करून अहवाला आणती त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी याच आशयाचे निवेदन बालाजी देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे हे निवेदन सदर गृह विभागास प्राप्त होऊन याच अनुषंगाने अप्पर सचिव गृह विभाग  दिलीप बागणी यांनी पोलीस महासंचालक यांना अति तत्काळ पत्रकारित या संदर्भात चौकशी तात्काळ करून बालाजी देशमुख यांना उपोषणापासून परावर्तन करण्याचे आदेश जारी केले आहेत.
     भ्रष्टाचारांच्या पाठीशी उभे राहून सर्वसामान्य जनतेला त्रस्त करणाऱ्या या ठाणेदाराविरुद्ध गृह विभाग तसेच पोलीस महासंचालक कोणती कारवाई करणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात केंद्रा खुर्द गाव आज सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार का हा प्रश्न सुटलेला नाही.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *