मानव विकास ची एकच बस असल्याने मोठी अडचण योगेश नागोलकार राहेर:- पातूर तालुक्यातील सस्ती परिसरातील विद्यालयात मुली शिकवणी साठी जात असून या ठिकाणी सुकळी, चतारी,राहेर, अडगाव,उमरा सावरगाव,चान्नी,सांगोळा,तुंलगा,दिग्रस आदि गावतील मुली शिक्षणाकरिता रोज जाणे येणे करतात.परंतु शासनाकडून सुरू केलेल्या मानव विकास ची बसेस ची कमतरता असल्याने ह्या बसेस मूळे मुलींना घरी जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.त्यामुळे परिसरातील पालकांची नाराजीचा सुरू उमटत आहे. मुलींचे शिक्षण व्हावे या उदात्त हेतून शासन विविध उपक्रम राबविते तर मुलींना शाळेत जाणे येण्यासाठी मानव विकास बस ही मोफत आहे.परंतु या परिसरात बसेस ची ही सेवा वेळेवर मिळत नसल्याने या परिसरात बसेस वाढविण्यात यावे अशी मागणी पालकांकडून होत आहे.शनिवार रोजी विद्यार्थ्यांची गाडीला येण्यास विलंब झाल्याने मुली चक्क आठ वाजता घरी पोहचल्या .या शाळेपासून गावचे अंतत फक्त ५ ते आठ किलोमीटर असून सुद्धा दोन ते तीन तास घरी यायला वेळ लागतो आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.सर्व कामे सोडून आपल्या मुलींसाठी शोधाशोध किंवा वाट पाहावी लागते.सांगोळा या गावातून येण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने पालक वर्ग एक ते दोन किलोमीटर पायी चालत तुंलगा येथे पोहचले होते तर बसेस ७ च्या नंतर अंधारात पोहचली होती.तरी वरिष्ठ प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन ही बसेस वाढव्यात. यासाठी पालक वर्ग शाळेत जाऊन विनंती केली आहे. बसेस ला उशीर झाला तर शाळेकडून खाजगी बस करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे पालकांनी सांगितलं आहे.यावेळी सुखदेव अवचार,गणेश गोकुळकार, भिवाजी ढाकरे रा सांगोळा,दिलीप इंगळे,प्रकाश रोकडे,विलास हिरळकर, राजेंद्र रोकडे,सुमेध शत्रुघ्न हातोले,रा तुंलगा यांनी संबधित शाळेच्या शिक्षकांना विचारणा केली असता या भागात एकच बस असल्याने उशीर होत असून वरिष्ठ कडे पाठपुरावा करणार असल्याचे पालकांना सांगण्यात आले आहे.
Users Today : 22