अखेर वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश ?

Khozmaster
1 Min Read

अकोट ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय चे काम त्वरित मार्गी लागणार प्रतिनिधी विशाल गवई अकोट गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले वंचित बहुजन आघाडी चे अकोट तालुका उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी ग्रामीण रुग्णालय आकोट येथे चांगली सुविधा होत नसल्यामुळे. गरीब सामान्य लोकांचे बळी जात असल्याचे व गरीब गरजु सामान्य लोकांची पुरेशी सोय करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब व उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदन दिले होते. निवेदनामध्ये वंचित बहुजन आघाडी चे उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता..या संदर्भात बऱ्याच मागणीसाठी 16-6-2022 ला उपविभागीय अधिकारी अकोट कार्यालयावर मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता.दिनांक 20-6-2022ते 28-7-2022 याचा पाठपुरावा केला.वारंवार पाठपुरावा करत अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहेहे यश खऱ्या अर्थाने लखन इंगळे व त्यांच्यासोबत असलेले मित्रमंडळी व सर्व पत्रकारांनी जिल्हाभर बातम्या प्रकाशित करून याचा आम्हाला अभिमान वाटतो असे मत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *