दिपक मापारी, रिसोड कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे 23 सप्टेंबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी 9 वाजता औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड येथून मोटारीने वाशिम जिल्हयातील मालेगांवकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता मालेगांव येथे आगमन व फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फतच्या शेतबांधावरील प्रयोगशाळेला भेट. दुपारी 12 वाजता मंगरुळपीर येथे हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. दुपारी 2 वाजता वाशिम येथील विठ्ठलवाडी सभागृहात आयोजित हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील काटा रोडवर बांधण्यात येत असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी संकुलाची पाहणी करतील. दुपारी 4.30 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लाभार्थ्यांच्या वारसांना श्री. सत्तार यांच्या हस्ते अनुदानाचे वाटप करण्यात येईल. सोईनुसार ते परभणीकडे प्रयाण करतील.
Users Today : 27