अकोट व तेल्हारा ओला दुष्काळ जाहीर करा प्रतिनिधी विशाल गवई अकोट तालुका व तेल्हारा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा . या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या या साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या यामध्ये अकोट व तेल्हारा ओला दुष्काळ जाहीर करा, आणि पिक विमा कापणी प्रयोग निकष न लावता सरसकट जाहीर करा अशा विविध मागण्या घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोट शिवाजी चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.तसेच यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांनवर गुन्हे दाखल करून अटक करून सोडण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु, युवक जिल्हाध्यक्ष सुशील पुंडकर, निखिल गावंडे, राजेश खारोडे,सागर उकंडे, ज्ञानेश्वर दहिभात, तुषार पाचकोर, मुन्ना बिहाडे, राहूल देशमुख, प्रमोद तायडे,राम मंगळे, कुलदीप बाजारे, भय्या देशमुख, गोलू भगत,बंटी पांडे,भय्या साहेब डिक्कर, प्रकाश डाखोरे,बलीभाई, समीर जमधार,आचल बेलसरे, पंकज हाडोळे, दिपक जाहले, बजरंग पालवे,पवन बंकुवाले, प्रमोद तायडे संदीप मर्दाने, सचिन काळे यांच्यासह अकोट व तेल्हारा येथील प्रहारचे आजी माजी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.