पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या संकल्पनेतुन उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अमंलदारांचा सत्कार…

Khozmaster
4 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अमंलदारांचा पोलीस अधीक्षक पी . आर पाटील यांच्या संकल्पनेतुन सत्कार करण्यात आला .        नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात साजरा झालेल्या गणेशोत्सव काळात डी . जे व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते . नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या आवानास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी . जे . मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता . डी . जे . व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती .    तसेच गणेशोत्सव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेत गणेशोत्सन सण पार पाडला म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय , नंदुरबार येथील संवाद हॉल येथे एका छोटे खानी कार्यक्रमाचे काळात काळात नंदुरबार आयोजन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांचे अध्यक्षते खाली करण्यात आले होते गणेशोत्सव काळात सतत ११ दिवस बंदोबस्त केल्यानंतर पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार प्रचंड मोठ्या प्रमाणात थकलेले होते .     पी . आर . पाटील यांचे संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या सत्कार समारंभामुळे पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे चेहऱ्यावर हसू फुलले होते . गणेशोत्सव काळात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व उप – विभागीय पोलीस अधिकारी , सर्व – पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच सर्व शाखा प्रभारी अधिकारी व त्यांचे अंमलदार यांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर आर . पाटील यांनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला . गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा अर्थातच प्रणाली राबविण्यात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावून नंदुरबार जिल्ह्याचा नावलौकीक करण्यास मदत करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचाही प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .     तसेच मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचा देखील पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सत्कार केला . या मध्ये नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत वळवद ते उमर्दे दरम्यान म्हशींच्या तबेल्याजवळ रोडवर डोळ्यात मिरची पुड फेकून , बंदुकीचा धाक दाखवून सराफ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला जेर बंद करणाऱ्या पथकाचा देखील सत्कार करण्यात आला .   गुजरात राज्या मधील तापी जिल्ह्यातील भिल जांभोली येथील दोन संशयीतांना ताब्यात घेवून त्याच्या कडून १ लाख ५६ हजार ५०० रुपये किमतीचे ६ मोबाईल हस्तगत करुन नंदुरबार शहर उपनगर व नवापूर पोलीस ठाणे येथील एकुण ०६ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस उघडकीस आणणारे व नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील ३ लाख ६५ हजार ३०६ रुपये किमतीचे इनव्हर्टर व बॅटऱ्या हस्तगत करुन २ आरोपीतांना ताब्यात घेवून गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांचाही समावेश होता . तसेच नवापुर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ७ ९ हजार ६५४ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी २४ तासाच्या आत उघड करुन हस्तगत करुन १ आरोपीतास ताब्यात घेणारे अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दतील खापर गावाचे पुढे अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर महाराष्ट्रात बंदी असलेला २४ लाख १२ हजार रुपये किमतीची सुगंधीत तंबाखूची वाहतूक करतांना मिळून आलेल्या आरोपीतास ताब्यात घेणारे अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचाही प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .    या वेळी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) विश्वास वळवी , आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व शाखेचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते .

 

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *