प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत शुक्रवार 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र बाबत ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
Users Today : 22