प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील ३० वर्षीय युवक चिंचपाड्याहून पहाटे गुजरात राज्यात कामानिमित्त जात असताना काल सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली . व्यारा रेल्वे पोलिसांकडून मिळविलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील किकाकई रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर रेल्वेतून खाली पडल्याने चिंचपाडा येथील प्रकाश आखड्या अहिरे रेल्वे खाली कापला गेल्याने अपघातात त्यांचे पोटापासून शरीराचे दोन भाग झाले . त्यात मृत्यू झाल्याची माहिती व्यारा रेल्वे पोलिसांनी दिली आहे . अपघात कसा झाला हे समजू शकले नाही . पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे . शवविच्छेदनासाठी सोनगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्यानंतर सोनगड नगरपालिकेच्या शववाहिनीने युवकाचे पार्थिव राहत्या घरी चिंचपाडा येथे आणण्यात आले . चिंचपाडा गावातील मुख्य बाजारपेठेत राहणारा तीसवर्षीय प्रकाश आखड्या आहिरे याचा अपघातात मृत्यू झाल्याने चिंचपाडा परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे . घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिवाराने प्रचंड आक्रोश केला . त्याच्या पश्चात आई , भाऊ , बहिण असा परिवार आहे . संध्याकाळी चिंचपाडा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले .
यावेळी परिवाराने प्रचंड आक्रोश केला .
Users Today : 22