प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार –: पाण्यातून जीव धोक्यात घालून वाट काढणाऱ्या वृद्धेचा रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तोल गेल्याने धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे . नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नागण मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे . धरणाच्या वरती असलेल्या केळी , केवडीपाडा गावा दरम्यान जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे . नागरिकांना या ठिकाणी पाण्यातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे . आज केळी येथील रहिवासी रतुबाई जयराम गावित ( वय ६० ),या केळीहून केवडीपाडा गावात येत असताना रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तोल गेल्याने धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे .
Users Today : 22