पक्ष पंधरवडा येता
खुश झाले कावळे
सभा घेती घाटावर
जमले हटून सगळे
केव्हांच मेले पितर
काढता आता गळे
आमच्यापेक्षा तुम्ही
कुठे आहांत वेगळे
आम्ही रंगाने काळे
जन्मजात रे कावळे
माणूस असून तुम्ही
आतून केवढे काळे
माणूस मेल्यानंतरचं
महत्व आमचे कळे
जीवंत माय बापांचा
दर्द का न कधी टळे
वृध्दाश्रमी माय बाप
काळीज का न जळे
पाहून असा देखावापा तक काळे उजळे
स्पर्श करता पिंडाला
हाकलाआम्हां सगळे
पक्षी आम्हीं अस्पृश्य
पुन्हा राहिलो कावळे
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
www.kavyakusum.com
Users Today : 1