प्रतिनिधी प्रविण चव्हाण -:नंदुरबार शहरात महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढून आंदोलन करण्यात आले .
महाराष्ट्र राज्यात नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत नेमणूक झालेल्या सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करून सन 1982 ची जुनी पेन्शन योजना रद्द करून शासनाने मोठा अन्याय केलेला आहे . याबाबत संघटनेच्या वतीने सातत्याने तीव्र विरोध करत आंदोलने केली जात आहे . नंदुरबार शहरात कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी जनजागृती निर्माण करत बाईक रॅली काढून आंदोलन करण्यात आले . दरम्यान संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले . शासनाने 1982 ची जुनी पेन्शन योजना रद्द करून कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय केलेला आहे . जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे . सदर आंदोलन जुनी पेन्शन करिता व्यापक आंदोलन उभे करण्याचा पहिला टप्पा असून शासनाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे .
Users Today : 22