अध्यक्ष सदस्य यांचे प्रभागात दुर्लक्ष..विकास आघाडीची कुरघोडी..एकता नगर वाशियांचे आरोग्य धोक्यात..दिपक मापारी, रिसोड शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील एकता नगर येथील रस्ता नाली स्वच्छता याकरिता भीम टायगर सेना तालुका अध्यक्ष राहुल जुमडे यांनी नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. मागील अनेक वर्षापासून रहिवाशी असलेल्या नागरिकांनी अनेक वर्षापासून नगरपरिषदेला निवेदन लेखी तक्रारी देऊन सुद्धा ना रस्ता ना नाली अनेक सुविधा पासून एकता नगर वाशी यांना वंचित ठेवले जात आहे. रस्त्यावर येत असलेल्या नागरिकांची संडासचे घाण पाण्यामुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून चिखलमय झाला आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक अति आवश्यक असलेले रुग्ण यांना मोठी कसरत करून रस्त्यावर ये जा करावे लागत आहे. एकता नगर येथील नागरिकांनी अनेक वेळेस लोकप्रतिनिधी यांना आपल्या समस्या सांगून सुद्धा लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या विकासाची आघाडी नुकतीच नावाला तर नाही ना असा प्रश्न एकता नगर वाशियामध्ये पडला आहे. यावेळी निवेदन करते राहुल जुमडे भीम टायगर सेना तालुका अध्यक्ष, बंडू शेजुळ भिम टायगर सेना शहर अध्यक्ष, प्रकाश पंडित, अजय कामटे, सिद्धार्थ जुमडे, बंटी जुमडे, राहुल घुगे, मयूर जुमडे, सुरज शेजुळ, रवी बर्वे पाटील आदी भीम टायगर सेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..
Users Today : 27