भगर पीठ खाल्ल्याने विष बाधा

Khozmaster
1 Min Read

महेंद्र हिवाळे चिखली प्रतिनिधी

चिखली-:चिखली तालुक्यात वेगवेगळ्या गावातील जवळपास १५ ते २० लोकांना विषबाधा ते झाल्याची घटना घडलीय , या सर्वावर सध्या विविध खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत . काल २१ सप्टेंबर रोजी एकादशी असल्याने अनेक लोकांनी उपवास ठेवले होते , ग्रामीण भागातील काही लोकांना उपवास असल्यामुळे त्यांनी भगर पीठ खाल्ली , परंतु काही वेळानंतरच अनेकांना उलटी , डोकेदुखी , चकरा येण्यासारखे झाले , काहींना वाटले की एसीडीटी मुळे हे सर्व होत असावे , परंतु तब्येत जास्त बिघडत असल्याने त्यांना चिखली मधील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले . डॉकटर नी तपासणी केल्यावर लक्षात आले की भगर पीठ खाल्ल्याने याना विषबाधा झालीय . असे एकापाठोपाठ पंधरा ते वीस रुग्ण वेगवेगळा रुग्णाल भरती झाले असून सर्वांना एकच त्रास होत आहे . सध्या सर्वाची तब्येत बरी असल्याचे ही डॉकटर चिंचोले नी सांगितलेय . तर ज्या लोकांना भगरचे पीठ खाल्ल्याने त्रास झालाय , त्यांनी आपल्याच गावातील दुकानातून ते पीठ विकत घेतले होते . तर ज्या दुकानदारांनी पीठ विकत घेतले ते चिखली दुकानदारांकडून विकत घेतले अशी माहिती मिळते आहे . याचा तपास एफ डी ए चे अधिकारी करत आहेत .

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *