टाकळी येथे सोमवारपासून श्रीमद् भागवत कथेस सुरुवात २३ ते ३० मार्चदरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

KHOZ MASTER
2 Min Read

मोताळा 

तालुक्यातील टाकळी (वाघजाळ) येथे श्रीक्षेत्र महादेव संस्थान येथे २३ ते ३० मार्च दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याचे हे २३ वे वर्ष असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या सप्ताहात कथावाचन गोपाल महाराज कचोरे (डिडोळा) करणार असून ज्ञानेश्वरी पारायण वाचन ज्ञानेश्वर महाराज शिराळ यांच्या हस्ते होणार आहे.

सप्ताहाचे आयोजन वासुदेव महाराज शास्त्री (वाघजाळ आश्रम) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

दैनंदिन कार्यक्रम

  • सकाळी ५ ते ६ – काकडा आरती
  • सकाळी ७ ते १० – श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण
  • सकाळी १० ते १२ – श्रीमद् भागवत कथा
  • दुपारी २ ते ३ – प्रवचन
  • दुपारी ३ ते ५ – श्रीमद् भागवत कथा
  • सायंकाळी ६ ते ७ – हरिपाठ
  • रात्री ८.३० ते १०.३० – कीर्तन

कीर्तन कार्यक्रम

  • २३ मार्च – श्रीराम महाराज पाटील (चाळीसगाव)
  • २४ मार्च – श्रीकांत महाराज (मोरखेड)
  • २५ मार्च – शिवदास महाराज राहणे (पान्हेरा)
  • २६ मार्च – योगिनीताई वसतकार (येरळी)
    • रात्री १० ते १२ – वासुदेव महाराज शास्त्री यांचे रामजन्म उत्सव कीर्तन
  • २७ मार्च – गजानन महाराज कोल्हे (काकोडा)
  • २८ मार्च – ज्ञानेश्वर महाराज महाले (डिघी)
  • २९ मार्च – राम महाराज गाडेकर (शेलूद)
  • ३० मार्च – सारंगधर महाराज (गोळेगाव) यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन

या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र महादेव संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *