चिंचोली सांगळे येथील आगग्रस्तास तत्काळ मदत माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांचा पुढाकार

KHOZ MASTER
1 Min Read

लोणार

चिंचोली सांगळे येथे २१ मार्च २०२६ रोजी दुपारी लागलेल्या भीषण आगीत विठ्ठल लाभाजी कुटे यांचे किराणा दुकान पूर्णतः जळून खाक झाले. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी २२ मार्च रोजी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि कुटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

या वेळी त्यांनी ३१ हजार रुपयांची आर्थिक मदत देत भविष्यातही आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना त्यांनी “समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी लोकसेवा आहे,” असे सांगितले.

या प्रसंगी बळीराम मापारी, कारभारी सानप, विठ्ठलराव जाधव, पंजाबराव घुगे, शिवानंद सांगळे, संतोष सांगळे, अभिमन्यू सांगळे, पंढरी सांगळे, साहेबराव पाईकराव, दुनियादास कांबळे, रामकिसन सांगळे आदी उपस्थित होते.

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *