प्रतिनीधी – रवि मगर सवना येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळे वर्षानुवर्षे त्याच व्यक्तीच्या ताब्यात असून गेल्या काही वर्षांपासून तेच लोक या गाळ्यांचा वापर करीत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने हे गाळे भाडेतत्त्वावर दिले असुन गाळा धारकांच्या 10-15 वर्षांपासून ताब्यात आहे त्यांनी गळ्याचे भाडे सुद्धा भरलेले नसून भाडे सुध्दा थकीत आहे. ज्यांना ग्रामपंचायत ने गाळे भाड्याने दिले आहे त्यांनी ते बेकायदेशीर रित्या दुसऱ्यांना भाड्याने दिलेले आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे मनसे सवना शाखेच्या वतीने दिनांक 06/07/2022 रोजी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वात ग्राम पंचायत कार्यालयास निवेदन देण्यात आले होते त्याची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालयाने आज दि.23 सप्टेंबर रोजी मनसे पदाधिकाऱ्यांच्या समक्ष तात्काळ सर्व गाळे खाली करून त्यांना कुलूप ठोकले व लवकरच सर्व गाळ्यांचे पुनश्च लिलाव केला जाईल असे सांगितले सवना शाखेचे हे दुसऱ्यांदा यश असून त्यांची सर्व स्तरातून प्रशंसा केली जात आहे. त्यावेळी श्रीनाथ पवार, परमेश्वर गाढवे, सचिन थिगळे, ज्ञानेश्वर हाडे, उमेश भुतेकर, संतोष पवार, गजानन भुतेकर, अनिल हाडे, विलास जाचक, बद्री बनसोडे यांसह अन्य कार्यकर्ते तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
Users Today : 22