एल. आर. टी. चा कॅडेट रोहित डिगे याची थल सेना कॅम्प दिल्लीसाठी निवड

Khozmaster
2 Min Read

दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाचा एन. सी. सी. कॅडेट रोहित डिगे याची दिल्ली येथे सुरू असलेल्या थल सेना कॅम्प मध्ये निवड झाली आहे. या कॅम्प मध्ये तो महाराष्ट्र डायरेक्टटेड चे नेतृत्व करत आहे. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी, लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला तसेच एल.आर .टि. कॉलेज ऑफ कॉमर्स अकोलाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके आणि एन. सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या मार्गदर्शनात तो आज महाराष्ट्र डायरेक्टरेट चे प्रतिनिधित्व करीत आहे. रोहित हा महाविद्यालयात बी. कॉम. प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून, तो स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणाचा उपयोग या कॅम्प दरम्यान संपूर्ण भारतासमोर करीत आहे. अमरावती एन. सी. सी. ग्रुप हेडक्वार्टर अंतर्गत कॅडेट रोहित डिगे हा महाराष्ट्र डायरेक्टटेड तर्फे रायफल शूटिंग या प्रकारामध्ये सहभागी झाला आहे. या सैनिकी कॅम्पची सुरुवात अमरावती येथे ५ जुलै, २०२२ पासून झाली होती. अमरावती व अहमदनगर येथील ७ वेगवेगळ्या कॅम्प तसेच प्रतियोगिता पार करून आज तो याठिकाणी पोहचला आहे. या कॅम्पच्या दरम्यान त्याने इंटर बटालियन काॅम्पिटिशन मध्ये द्वितीय स्थान आणि इंटर ग्रुप काॅम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले. दिल्ली येथे सुरु असलेल्या थल सेना कॅम्प हा दि. १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२२ या दरम्यान होत असून या कॅम्प मध्ये त्यांना डि. जी. एन. सी. सी. लेफ्टनंट जनरल गुरुबीरपाल सिंह यांच्या सोबत संवाद साधन्याची संधी प्राप्त होत आहे. सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे हा त्याच्या यशाचे श्रेय त्याची आई वर्षा डिगे ला देतो. त्याच्या या कामगिरी बद्दल दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्रजी जैन, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजितजी परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

0 9 4 6 2 2
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *