प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण. नंदुरबार : निवृत्ती वेतनधारकांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतन धारकांसाठी शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता निवृत्ती वेतनधारकांचा त्रैमासिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व राज्य निवृत्ती वेतनधारकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे. तसेच 80 वर्षांवरील राज्य शासकीय निवृत्तीवेतन,कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी या मेळाव्यात येतांना आपल्या वयाबाबतचा पुरावा कोषागार कार्यालयात जमा करावा. असे जिल्हा कोषागार अधिकारी दे.ना.पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
Users Today : 22