प्रतिनीधी अशोक भाकरे गट ग्रामपंचायत टाकळी( नि) अंतर्गत येत असलेल्या ग्राम मनाडी येथे सामाजिक कायकर्ते रामदास ताले यांनी गावात स्वखर्चातून वाढलेल्या गवतावर औषध फवारणी केली. ग्राम मनाडी येथे मोठ्या प्रमाणात गवत निर्माण झाले असून त्यामुळे गावात डासांची, वेगवेगळ्या किटकांची पैदास निर्माण झाली होती. यामुळे गावातील गावकऱ्यांना थंडी हिवताप सारख्या आजारांनी ग्रासले होते, यावर उपाय योजना म्हणून सामाजिक कायकर्ते रामदास ताले यांनी स्वखर्चातून गावात वाढलेल्या गवतावर औषध फवारणी केली, यापूर्वी रामदास ताले हे समाजपयोगी कार्यक्रम, उपक्रम राबवत असतात…गावात डासांची कीटकांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली होती, गामपंचायतने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही म्हणून यावेळी मी स्वतः गावात स्वखर्चातून फवारणी केली.
– रामदास ताले पाटील
सामाजिक कार्यकर्ते
तथा संचालक हॉटेल जय महाराष्ट्र
Users Today : 17