सांगत आले कथा
पितृपक्ष हा पाळा
रे अशुभ पंधरवडा
शुभ कार्यास टाळा
भितोआपण किती
रे पितरांच्या छळा
गेल्या नंतरही तया
नावाने काढी गळा
अंधश्रद्धेचा पगडा
पराचा करे कावळा
एकाक्ष देतोयं साक्ष
बने माणूस बावळा
कावळ्या पुढे ठेवा
भात पिंडाचा गोळा
कितीआनंद मनाला
कावळे होता गोळा
जिवंत माता पित्या
कधी लावला लळा
गेल्यावरी सांभाळा
अरे लाडक्या बाळा
जंतर मंतर म्हणूनि
श्वास घेतला मोकळा
वरिष्ठा आपले छळा
कोण जाणतो कळा
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
www.kavyakusum.com
Users Today : 1