वाळूची अवैध वाहतूक , दोघांविरोधात गुन्हा दाखल.

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार –: नंदुरबार तालुक्यातील आराळे गावाजवळ वाळूची अवैध वाहतूक करतांना आढळून आल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .   या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार तालुक्यातील आराळे गावाजवळ संजय पांडूरंग राजपूत ( रा . बह्याणे ता.नंदुरबार ) व ट्रॅक्टरवरील ( क्र . एम.एच .१८ झेड ५ ९ २७ ) चालक एक अनोळखी इसम हे ट्रॅक्टरमध्ये वाळूची अवैधरित्या वाहतूक करतांना आढळून आले .    पोलिस आल्याचे लक्षात आल्याने दोघेजण अंधाराचा फायदा घेवन ट्रॅक्टर सोडून पळून गेले . पोलिसांनी ५ हजार रुपये किंमतीची सव्वा ब्रास वाळू व २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर ट्रॉली असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे .   या बाबत पोना . साहेबराव जाधव यांच्या फिर्यादी वरुन सदा नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३७ ९ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .    पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भिंगारदे करीत आहेत .

0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *