बोलेरो वाहन उलटल्याने तिघे जखमी.

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: धडगाव तालुक्यातील आंबागव्हाण फाट्या जवळ बोलेरो वाहन उलटल्याने तिघांना दुखापत झाली असून या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .   या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , धडगाव तालुक्यातील चुलवड येथील संतोष अर्जुन पावरा हा त्याच्या ताब्यातील बोलेरो वाहन ( क्र . एम . एच . ३ ९ एडी १३५४ ) धडगावकडून तळोदाकडे जात होते . यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष भरधाव वेगात वाहन चालवून आंबागव्हाण फाट्या जवळील डॅम जवळ वाहन उलटल्याने अपघात घडला .     घडलेल्या अपघातात संतोष पावरा , अजय भिमसिंग पाडवी , श्रावण खेमा तडवी यांना दुखापत झाली . तसेच वाहनाचेही नुकसान झाले .    या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गिरधर जाधव यांच्या फिर्यादी वरुन तळोदा पोलिस ठाण्यात संतोष पावरा याच्याविरोधात भादंवि कलम २७ ९ , ३३७ , ३३८ , ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोहेकॉ . राजधर जगदाळे करीत आहेत .

 

0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *