प्रतिनिधी प्रविण चव्हाण नदुरबार -:तळोदा शहरातील रामगढ परिसरात अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , तळोदा शहरातील रामगढ परिसरातील एका १३ वर्षीय मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेले . याबाबत मुलीच्या आईने तळोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरुन अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत .
Users Today : 37