दिपक मापारी, रिसोड तालुक्यातील शेतकरी वर्ग यांच्या वतीने अर्ज दिला की या अगोदर PM किसान सम्मान निधी योजना चालू होती, व नंतर बंद झाली, आता काही दिवसा अगोदर योजना सुरु झालेली असून बऱ्याच शेतकरी वर्गाचे ऑनलाईन त्रुटी असतांना त्या अडचणी लवकरात लवकर दूर कराव्या.तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या सम्मान निधी स्टेटस वर पेंडिंग आहेत,ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सोडवाव्या व लाभार्थीना तरी सर्व पात्र लाभार्थ्यांना PM किसान सम्मान निधी सरसगट देण्यात यावा अशा विविध गोष्टीवर चर्चा करत मा. तहसीलदार साहेब रिसोड यांना सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी निवेदन दिले.
Users Today : 27