दिपक मापारी, रिसोड रिठद गाव रिसोड तालुक्यातील सर्वात मोठे पण नाव मोठे लक्षण खोटे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.कारणही तसंच आहे.रिठद गाव सुशिक्षित आणि बेरोजगाराची येथे खुपचं जास्त येथे सुशिक्षित लोक जास्त म्हणावं तर रिठद ते खंडाळा शिंदे रस्ता १९८५साली रोजगार हमी योजनेअंतर्गत याच रस्त्याचे मातीकाम खडीकरण करण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत डांबरीकरण व्हावे असे आमदार, खासदार या मंडळींना किंवा येथील सुशिक्षित मंडळींना कधी वाटलेच नाही तर येथे बेरोजगारी जादा वाढलेली असल्याने हि मंडळी शेतीत कामे करतात पण शेतमजुरी शिवाय पर्याय नाही पण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले पाहिजे त्यासाठी त्यांचे ऐकेल कोण?हा खरा प्रश्न निर्माण होतो.गावात नेहमी हिच चर्चा होत राहते एव्हढ मोठं गाव असून अद्यापही खंडाळा शिंदे रस्त्याचे डांबरीकरण का होत नाही.पण सुशिक्षित लोक असुनही अज्ञानपणाणे वागत आले हेही हे रस्ता न होण्यासाठी कारण आहे.जोपर्यंत सुशिक्षितांचे मत परिवर्तन होत नाही तोपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण होणार नाही असा पक्का समज गावातील शेतकऱ्यांचा व बेरोजगार शेतमजूर यांचा झालेला आहे हा रस्ता यावर्षी होणार?पूढच्या वर्षी होणार असंच पिढ्या न पिढ्या चालू असून पुढे पुढे करणारी मंडळी गावभर फिरत सांगत राहतात पण डांबरीकरण होण्यासाठी मुहूर्त काही निघेना या रसत्याची अवस्था खुपचं बिकट झाली आहे दरवर्षी शेतकऱ्यांना शेतीची मशागतीची कामे,शेतातील पिकविलेला माल आणण्यासाठी चांगला पाहीजेत असलेला रस्ता कधी होणार ? याकडे लक्ष ठेऊन शेतकरी आहे.शेतकऱ्याच्या हितासाठी, सुखासाठी राजकीय मंडळी तथा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे अशी अपेक्षा नारायण आरु यांनी व्यक्त केली..
Users Today : 27