दिपक मापारी, रीसोड तालुक्यातील केनवड जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येत असलेल्या नंधाना येथील जिल्हा परिषद शाळेला मंजूर झालेली कामे जि.प. सदस्यांने येथील जिल्हा परिषद शाळेला डावलून व दबाव टाकून ही कामे पिंपरी सरहद या ठिकाणी नेल्याची तक्रार सरपंच, उपसरपंच, शाळा समिती सदस्यासह गावकरी यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की आमच्या येथील जिल्हा परिषद शाळेची निवड ई लर्निंगमध्ये झाल्यानंतर केनवड येथील जि.प. सदस्य यांनी कंपनीवर दबाव आणून व आपल्या पदाचा व सत्तेचा गैरवापर करून नंधाना गावाला डावलून हा निधी त्यांनी पिंपरी सरहद येथे वळता केला असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.सरपंच अनिता झुंजारकर, उपसरपंच गोरख पाटील बोरकर, अध्यक्ष शाळा समिती नंदा मोरे, उपाध्यक्ष शाळा समिती अमोल साखरे, ग्रामपंचायत सदस्य गजानन बोरकर, राजू पाटील बोरकर, संजय चतुर, आंबाराव उबाळे, भगवान उबाळे, तसेच बाबुराव बोरकर, दत्तराव बोरकर, विनोद वानखेडे, गंगाराम बोरकर, उद्धव बोरकर, कैलास बोरकर, यांच्यासह गावकऱ्यांनी मागणी केली..
Users Today : 27