मुख्यमंत्री साहेब, जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावा – कास्तकार फाऊंडेशनची मागणी

Khozmaster
1 Min Read

दिपक मापारी, रिसोड वाशिम जिल्ह्यातील रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून वाशिम शहरातील व खेडे भागातील रस्ते अतिशय निकामी झाले आहेत. रस्त्यावर मोठ-मोठे अपघाताला अमंत्रण देणारे खड्डे पडलेले आहेत. आणि यामुळे खेडे भागातील आजारी वृद्धांना, गर्भवती महिलांना, शाळकरी विद्यार्थ्यांना,व सर्व सामान्यांना आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. सदर महत्वाची बाब जिल्हा प्रशासनाकडून निकाली लागत नसुस जनसामान्यांना याचा भुर्दंड भरावा लागत आहे. या रोडमुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. रोडवर खड्डे पडल्यामुळे आजारी, गर्भवती महिनां जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दवाखान्या मध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांचा नाकर्ते पणा. तसेच जिल्हा प्रशासन या कडे डोळेझाक करत आहे. आणि ज्या रस्त्याचे काम मंजूर होते.तो रस्ता सुद्धा सुरू होतो मात्र तो रस्ता जास्त काळ न टाकता, 1 किंवा 2 वर्ष्यात परत जशाच तसा होतो. जिल्ह्यातील तसेच रोडवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.आघाडी सरकार आले असता. सरकारकडे जनसामान्यान गोरगरीब जनता अपक्षेने बघते आहे. या आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा, जनसामान्यांची आहे. जिल्ह्यातील रस्त्यांना दार्जोन्नती द्यावी. वर्षनुवर्षे प्रलंबित असलेला महत्वाचा प्रश्न मार्गी लावावा. विनंती मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचे कडे कास्तकार फाऊंडेशन च्या वतीने अध्यक्ष विष्णुपंत बाजड यांनी केली.

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *