दिपक मापारी, रिसोड कवठा येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रिसोडच्या वतीने दि.१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण महिन्यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि.२२ सप्टेंबर रोजी कवठा बिटमधील १३ गावातून ६ महिने ते ३ वर्ष व ३ते ५ वर्ष वयोगटातील बालकांची सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली.यावेळी दोन्ही वयोगटातील अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बालक व पालक यांची निवड करण्यात आली निवड केलेल्या विजेत्या बालकांना फळांची टोपली व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर बालकांना केळी व राजगुरा याचा लाडू, शेंगदाण्याचा लाडू, खजुराचे वाटप करण्यात आले.यावेळी रांगोळी स्पर्धेत कडधन्ये डाळी, भाज्या, फळे यापासून विविध रांगोळी किशोरीमुली गरोदर माता, स्तंनदा माता, यांनी काढल्या त्यामध्ये पोषण बाहुली व स्तंनदा माता व बालकांचे हजार दिवस या रांगोळी मुख्य आकर्षक ठरल्या तसेच पोषण रथाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये छोटा शेतकरी व त्यांची पत्नी गावचे प्रमुख आकर्षक ठरले. सकस आहाराच्या मनी द्वारे गावामध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली तसेच गावातील वयस्कर आजींनी पारंपारिक व विसूतीत गेलेल्या सकस आहाराच्या पाककृतीत उत्कर्तपणे सहभाग नोंदवून उत्साह वाढविला..यावेळी – या कार्यक्रमासाठी गावातील प्रमुख सरपंच सौ. अनिताताई भि. सावसुंदर, सौ.त्रिगुणा साबळे गा.प. सदस्या , सचिव आरु साहेब, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद बाल विकास प्रकल्प अधिकारी विधाता कवठकर, प्रवेशिका अस्मिता गिहे, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि वेगवेगळ्या गावातील कवठा बिटमधील सेविका व मदतनीस नागरिक उपस्थित होते..
Users Today : 27