मालेगाव प्रतिनिधी मालेगाव :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाणक्य कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम गुण घेऊन यशाची परंपरा कायम राखली. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सर्व शाळा व क्लासेस बंद होते त्या परिस्थितीमध्ये शिक्षणाशी संघर्ष करून आणि प्रा. विशाल घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण परिश्रम घेऊन यश गाठले. विद्यार्थी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून शिक्षणाची जिद्द मनाशी ठेवून त्यांनी त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.मागील तब्बल पाच वर्षापासून सर्वाधिक विद्यार्थी घडणारी शिक्षण संस्था म्हणून प्रा. विशाल घुगे सर संचालित चाणक्य कोचिंग क्लासेस पूर्ण वाशिम जिल्ह्यात नावलौकिक झाले आहे. चाणक्य च्या टीमने घेतलेले ज्ञानदानातील कठोर परिश्रम, विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासरूपी कष्टाच्या बळावर प्रचंड मोठे यश प्राप्त केले. त्यामधे कु. दीपिका गायकवाड हिला 87 पर्सेंटाइल घेऊन उज्वल अशी यशाचे संपादन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चाणक्य संचालक प्रा.विशाल घुगे सर व त्यांच्या संपूर्ण CCC टीमच्या वतीने कौतुक केले आहे.
Users Today : 27