विरोधी नगरसेवक प्रशांत चौधरींच्या हरकती नंतर : नुतन नगरपरिषदेच्या इमारतीचे वॉल कंपाऊंडच्या भिंती नव्याने बांधकाम करण्यात आल्या….

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: नंदुरबार येथील नगरपरिषद चे जुन्याच वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर केले जात होते काम; काही महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीनंतर नव्याने बांधले वॉल कंपाऊंड.   नगरपरिषदे ची भव्य दिव्य इमारत उभारण्यात येत असून या इमारतीचे अंतिम टप्प्यात काम सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी या इमारतीच्या जुन्याच संरक्षण भिंतीवर खांब बांधून बांधकाम करण्यात येत होते. परंतु पालिकेतील भाजपाचे व प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक प्रशांत कन्हैयालाल चौधरी यांनी यासंदर्भात आवाज उठवत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पालिका प्रशासनाने तत्काळ संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन इमारत संरक्षणाच्या नव्या भिंती उभारण्याचे सांगितले. नगरसेवक प्रशांत चौधरी यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आल्याने आता नंदुरबार नगरपालिकेच्या नव्या इमारत संरक्षणाच्या भिंती (वॉल कंपाऊंड) नव्याने बांधण्यात आले असून समाधान व्यक्त होत आहे.

नंदुरबार नगरपरिषदेची नवीन इमारत शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या न्यायालयाच्या जागेवर सुमारे 22 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. नंदुरबार नगरपरिषदेची इमारत भव्य दिव्य असून साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. या इमारतीत पालिकेतील सर्वच विभागांचे कार्यालय, नगराध्यक्षांचे कार्यालय अशी विविध दालने असतील. तसेच पार्किंगची देखील व्यवस्था याठिकाणी असणार आहे. या इमारतीच्या काही अंतरावर संरक्षण भिंती देखील बांधण्यात येत आहेत. त्यामुळे ही इमारत अजूनच शहराच्या सुशोभीकरणात भर टाकणारी असेल. मात्र काही महिन्यांपूर्वी या इमारतीचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून हलगर्जीपणा करीत जुन्यात संरक्षण भिंतीवर (वॉल कंपाऊंड) खांब उभारून काम करण्यात येत होते. ही बाब नंदुरबार नगर परिषदेतील व प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपाचे नगरसेवक प्रशांत चौधरी यांच्या लक्षात आले. नगरसेवक चौधरी यांनी तात्काळ ठेकेदाराकडून जुन्या भिंतीवर बांधकाम करण्यात येत असल्याची तक्रार नगरपरिषदेत केली. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदाराला जुन्या संरक्षण भिंती जमीनदोस्त करून नव्याने संरक्षण भिंती उभारण्याचे सूचित केले. नगरसेवक प्रशांत चौधरी यांच्या तक्रारीची दखल घेऊन पालिकेने दाखविलेल्या तत्परतेमुळे आज जुन्या संरक्षण भिंतीच्या जागेवर नवीन बांधकामाच्या संरक्षण भिंती उभारण्यात आल्या आहे. नगरसेवक प्रशांत चौधरी यांच्या कार्यतत्परतेमुळे ही बाब समोर आली. तसेच सत्ताधारींकडून देखील संबंधित ठेकेदाराची चांगलीच कान उघडणी करून इमारतीचे दर्जेदार काम करण्याचे सूचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. म्हणून आजच्या स्थितीत नंदुरबार नगरपरिषदेच्या भव्य दिव्य इमारतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून परिसरातील संरक्षण भिंती देखील नव्याने उभारण्यात आल्या आल्याने समाधान व्यक्त होत आहे.    नंदुरबार नगरपालिकेची नवीन इमारत बांधण्यात येत आहे. यामुळे शहराच्या विकासात अजूनच भर पडेल. मात्र काही महिन्यांपूर्वी इमारतीचे काम करणाऱ्या मक्तेदाराकडून जुन्या भिंती असलेल्या वॉल कंपाऊंडवर थातूरमातूर काम करून वॉल कंपाऊंड उभारण्यात येत होते. ही बाब लक्षात येतात प्रशासनाकडे तक्रार केली असता प्रशासनाने दखल घेऊन लागलीच संबंधित मक्तेदाराला सूचना देऊन जुन्या भिंती पाडून नव्याने वॉल कंपाउंड उभारण्याचे सुचित केले होते. म्हणून आज नवीन पालिका इमारतीच्या वॉल कंपाऊंडच्या भिंती देखील नव्याने उभारल्या गेल्या असून याचे समाधान वाटते. शहराचा विकास व्हावा, तोही गुणवत्तापूर्ण अशीच अपेक्षा आहे.

 

0 9 4 6 3 0
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *