शिवसैनिक शिवसेनेची खरी ताकद – ब्रम्हा पांडे

Khozmaster
2 Min Read

विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी –  शिवसेना प्रमुख स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार वाटेवर आणि प्रेरणेवर उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीनुसार शिवसेनेची होत असलेली वाटचाल शिवसैनिकांना बळ देणारी आहे. उद्भवलेली परिस्थिती पाहता विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आता शिवसैनिकच महत्वाची भूमिका बजावू शकतात .त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसैनिकांनी निष्ठावंत असल्याचा पुरावा देत आपली पक्षातील कामगिरी निष्ठेने बजावावी शिवसैनिकच शिवसैनिक खरी ताकद असल्याचे मत शिवसेनेचे जांब वसू जि प सर्कल चे शिवसेना पक्ष निरीक्षक ब्रह्मकुमार पांडे यांनी व्यक्त केले. बार्शीटाकळी तालुक्यातील जांबवसू जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत गावागावात पक्ष निरीक्षक ब्रह्मकुमार पांडे, माजी नगरसेवक गजानन चव्हाण यांनी बैठका घेतल्या. विविध गावात शिवसेनेच्या या बैठकांना शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यावेळी पक्षाने ठरवून दिल्याप्रमाणे शिवसेनेच्या विविध आघाडीचे पदाधिकारी यांची शिवसेनेतील माहिती संकलित करण्यात आली आहे. ही संपूर्ण माहिती जिल्हाप्रमुख आ .नितीन देशमुख तथा जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील हा संपूर्ण शिवसैनिकांचा लेखाजोखा शिवसेना नेत्यांकडे जाणार आहे. या अनुषंगाने जांबवसू सर्कल अंतर्गत लोहगड ,राजनखेड, वरखडे , चिंचोली, कोथळी खुर्द, धाबा ,जांभ वसू, आदी गावात दौरा करण्यात आला. यावेळी गावा गावा च्या शिवसैनिकांनी आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. या दौऱ्यात गजानन चव्हाण यांनी सुद्धा गावागावातील शिवसैनिकांना मार्गदर्शन करत शिवसेना मजबूत करण्याचे आवाहन केले. गावातील शाखाप्रमुखांनी शिवसेना निरीक्षक ब्रम्हकुमार पांडे व गजानन चव्हाण यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. यासोबतच पक्ष निरीक्षक यांनी विविध गावातील जनसामान्यांच्या समस्या सुद्धा समजून घेतल्या. या विविध गावात राजनखेड शाखा प्रमुख साहेबराव घुगे, बुथ प्रमुख गणेश नागरे, लोहागढ़ गोपाल ढोर, शुभम घुगे, सोनु नागरे ,मयूर जाधव, प्रशांत आधळे ,चंद्र सिंह राठौड़ ,भागवत हातोलरकर, जि प सर्कल प्रमुख किशोर घुगे

शिवसैनिक उपस्थित होते

 

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *