मुंडगाव येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई अकोट१२१ रुग्णांच्या होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया ) श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव ता अकोट येथे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हॅगिंग गार्डन, मुंबई., दम्माणी नेत्र रुग्णालय आणी संवेदना ग्रुप अकोला यांच्या सौजन्याने भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन दि २३ सप्टेंबर २०२२ शुक्रवार रोजी करण्यात आले होते. या मध्ये ३५० रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला. १२१ पात्र ठरलेल्या रुग्णांची लेन्स टाकून बिनटाक्याच्या पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया दम्माणी नेत्र रुग्णालय अकोला येथे करण्यात येईल . व गरजू रुग्णांना १०० रुपये या अल्प दरात चष्मे वाटण्यात आले. यावेळी सत्य साई सेवा संघटन तर्फे रुग्णांना मोफत औषधी वितरीत करण्यात आल्या .     या शिबीराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री कैलास शेठ अग्रवाल अकोट , उद्घाटक श्री दिपकजी भरतीया, अध्यक्ष श्री गोरक्षण संस्थान, अकोला हे होते तर प्रमुख अतिथी श्री शामरावजी आपोतीकर अध्यक्ष संवेदना ग्रुप,श्री सभापतीजी शुक्ल व्यवस्थापक, दम्माणी रुग्णालय, श्री ज्ञानदेवराव चव्हाळे उद्योजक, अकोट, श्री तुळशीराम इस्तापे नागास्वामी संस्थान बोर्डी , श्री मनिष मोडक, अध्यक्ष पानेट संस्थान, श्री आशिष आपोतीकर, श्री दिनेश देशमुख बोर्डी, श्री नारायणराव इंगळे, अध्यक्ष विहीर संस्थान, श्री ओंकारराव टवलारे, उपाध्यक्ष, विहिर संस्थान, श्री श्रावणजी भरक्षे, सरपंच मुंडगाव, श्री प्रविण भिरडे, श्री प्रशांत अग्रवाल व सल्लागार समितीचे सदस्य श्री , प्रल्हाद राव सापधारे, तसेच दमानी नेत्र रुग्णालयाचे डॉ. अश्विन पराती, डॉ. सौ. शितल नागे, श्री अजय देशमुख, राजेश मुदलियार, श्री पवन साळवे, श्री रविंद्र गाढे यांची उपस्थिती लाभली . यावेळी संस्थानचे वतीने सर्व मान्यवरांचा पादुका संस्थानचे अध्यक्ष श्री विलास बहादुरे, सचिव श्री शरद सोनटक्के, व्यवस्थापक श्री महेश गाढे, विश्वस्त श्री ज्वारसिंग आसोले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी व्यासपीठावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचलन संस्थान चे कोषाध्यक्ष श्री विजय ढोरे यांनी केले, शिबीराच्या यशस्वीतेसाठी श्री नरेंद्र ठाकरे गुरुजी, श्री अरूण थारकर गुरुजी, श्री अशोक बेलसरे, श्री ओमप्रकाश अकर्ते, संस्थानचे कर्मचारी प्रशांत आकोते, शरद म्हैसने, शुभम हाडोळे, जनार्दन खलोकार, प्रल्हाद ओतोकार, हरसिंग रहेनवाल, प्रकाश क्षीरसागर, गजानन इंगळे, रामदास महल्ले, तसेच संस्थानचे मुंडगाव व आसेगाव येथील सेवाधारी यांनी परीश्रम घेतले.

 

0 9 4 5 6 0
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *