प्रतिनिधी रवि मगर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिन म्हणून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी रासेयो स्वयंसेवकांनी रासेयो गीताचे गायन करून कार्यक्रमास सुरुवात केली . या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी उपस्तीत विदयार्थ्यांना संबोधीत करतांना सांगितले की भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने १९६९-७० मध्ये सुरू केलेली एक योजना. सुरुवातीस ही योजना सक्तीच्या राष्ट्रीय छात्रसेना योजनेचा पर्याय म्हणून सुरू झाली. राष्ट्रीय छात्रसेना दलात न जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने राष्ट्रीय सेवा योजनेत भाग घ्यावा, अशी अपेक्षा होती. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार, नागरी संरक्षण इ. कार्यक्रमांचा या योजनेत समावेश आहे. १९७६-७७ पासून ग्रामीण विभागाची सुधारणा, तसेच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांच्या विकासाची कामे यांवर भर देण्यात आला. या प्रसंगी रा. स. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम काकड यांनी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले . तसेच सह कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे , प्रा. मोहजीतसिंग राजपूत, प्रा. सचिन सोळंकी , प्रा. सचिन गोरे. प्रा.श्वेता धांडे ,प्रा. शितल ढाकणे प्रा. जया डोंगरे , प्रा. ऋतुजा जाधव, प्रा. सोनाली इंगळे विद्यार्थी व विध्यार्थीनी यां
Users Today : 11