दिपक मापारी, रिसोड भारतीय कृषी अनुसंधान परीषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र, वाशीम द्वारे जिल्ह्यात खरिफ आणि रांगडा कांदा लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत असून त्या दृष्टीने पिक प्रात्याक्षिके, प्रक्षेत्र भेटी आणि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. याच उद्धेशाने दिनांक २२ सप्टेबर २०२२ रोजी रांगडा कांदा व्यवस्थापन या विषयावर वेबिणारचे आयोजन करण्यात आले होते.प्रशिक्षणाचे अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे यांची उपस्थिती होती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या तज्ञ निवृत्ती पाटील हे होते. सदर वेबिणार मध्ये विदर्भातील आणि प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकर्यांनी सहभाग नोंदविला.अध्यक्षीय भाषणात डॉ. रवींद्र काळे यांनी बाजारपेठे मधील मागणी व पुरवठ्याचा विचार करून पिक आणि हंगाम निवड करावा जेणेकरून अपेक्षित दर मिळून अधिकाधिक आर्थिक नफा मिळवता येऊ शकतो. तसेच घरगुती स्तरावर कृषी निविष्ठा तयार करून उत्पादन खर्चात बचत करून दुप्पट उत्पन्न मिळण्याकरिता प्रयत्न करावे असे आव्हान करून कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकरी बांधूसाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी कांदा पिकाच्या विविध हंगामातील लागवडी, महाराष्ट्रातील क्षेत्र, त्यासाठीचे वान, लागवड पद्धती, कीड व रोग व्यवस्थापन, खते व पाणी व्यवस्थापनातील इतर बाबी बद्दल सविस्तर माहिती दिली. सोबतच बाजारातील दरांचे महिनानिहाय चढ ऊतार या बद्दल सविस्तर माहिते देत या वर्षीच्या कांदा पिकाची सध्यस्थिती विषद करत येत्या काळात चांगले दर मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले. पुढे बोलताना लागवड खर्चातील प्रमुख बाबी म्हणजे पुनर्लागवड आणि तन व्यवस्थापन या बाबीवर कमी खर्चाचे नियोजन अवगत करून दिले.तद्नंतर उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे तज्ञांच्या वतीने निरासरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.
Users Today : 27