वन्यप्राणी रेस्क्यू पथकाने दिले अजगराला जीवदान

Khozmaster
1 Min Read

आलेगाव प्रतिनिधी येथील ग्रा पं चे सरपंच गोपाल गणपतराव महल्ले यांच्या शेतामध्ये आढळून आलेल्या अजगराला वनपरिक्षेत्र रेस्क्यू पथकाने सर्पमित्र यांच्या मदतीने अजगर सापाला जीवदान दिले.पातूर तालुक्यातील आलेगाव येथील ग्रा पं सरपंच गोपाल गणपतराव महल्ले यांच्या आलेगाव शेतशिवारातील सोयाबीन शेतातील गवताचे अडान कापनी करणाऱ्या महिलांना जवळपास १० फूट लांब असलेला अजगर आढळून आला असता सदर अजगर सापाला जीवदान मिळावे या अनुषंगाने ग्रा पं सरपंच गोपाल महल्ले यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांना अजगरा बाबत माहिती दिली.त्या नुसार वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी रेस्क्यू पथकाचे प्रमुख ए,आर,घुगे व सर्पमित्र स्वप्नील सुरवाडे,अमोल सोनोने,संजय बंड यांच्या मदतीने तात्काळ घटनास्थळ गाठून इंडियन रॉक पायथन या जातीच्या सापाला सुरक्षित पकडून पंचनामा करून वनपरिक्षेत्राच्या जंगलामध्ये सोडून देण्यात आले.साप अजगर तसेच इतर वन्यजीव शेतात आढळून आल्यास वनविभागाला कळविण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांनी शेतकऱ्यांना केले.

0 9 4 5 5 9
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *