प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: प्रकाशा – शहादा रस्त्यावरील लांबोळा मनरद दरम्यान शहाद्याकडे जाणाऱ्या बैलगाडीला मागुन येणाऱ्या कंटेनर ने धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे . दरम्यान या अपघातात बैलाचाही मृत्यू झाला आहे . या बाबत अधिक माहिती अशी की , प्रकाशा-शहादा रस्त्या वरील लांबोळा मनरद दरम्यान आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतमजुर हारसिंग सरदारसिंग गिरासे ( वय .४५ ) हा शेतात बैलगाडी घेवुन जात असतांना मागुन येणारा कंटेनर ( जे.जे .३८ , टि .६६७७ ) ने बैलगाडील धडक दिली . या अपघातात हारसिंग सरदारसिंग गिरासे यांचा मृत्यू झाला . हारसिंग सरदारसिंग गिरासे हे नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे येथील रहिवाशी असुन गेल्या १८ वर्षां पासुन ते लांबोळा येथे शेत मजुरी करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते.त्याच्या पश्चात आई , एक भाऊ , एक मुलगा , दोन मुली , एक जावाई , असा परिवार आहे . दरम्यान या अपघातात बैलाचाही मृत्यू झाला आहे .
Users Today : 17