पातूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती ची सभा नुकतीच पार पडली.

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी अविनाश गवई  : पातूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती ची सभा नुकतीच पार पडली असून यामध्ये श्रीमती मोनिका राऊत अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यामध्ये आगामी काळात होणारा दुर्गोत्सव, धम्मचक्र प्रवर्तनदिन आणि ईद या तिन महत्त्वपूर्ण सणांच्या पार्श्वभूमीवर पातूर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची सभा संपन्न झाली.

या सभेत उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना संबोधित करतांना अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.अनुचित कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.यावेळी विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांना तसेच पत्रकार बांधवांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित आले. सोबतच पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच बंदोबस्ता मध्ये काम करीत असतांना यावर्षी सुद्धा गणेशोत्सवा मध्ये नियमाचे व शिस्तीचे पालन करून बंदोबस्त केला.

अकोला जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.शहरात शांततेत पार पडलेल्या गणेशोत्सवाबाबत त्यांनी आनंद व्यक्त करून अशाच शांतीपूर्ण वातावरणात दुर्गोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन व ईद हे सण साजरे करण्याचे ही त्यांनी नागरिकांना आवाहन केले.गणेशोत्सवामध्ये व गणेश विसर्जन शोभायात्रेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळांकरिता प्रशस्तीपत्रे देण्यात आली.यावेळी पातूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा. हरिष गवळी, उपनिरीक्षक मा. हर्षल रत्नपारखी, सहाय्यक पोलीस मीरा सोनोणे, पठाण, श्रीधर पाटील, भवाने मेजर तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

0 9 4 6 3 7
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *