_नांदुरा प्रतिनिधि (शुभम ढवळे) :भारताला सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम व सामर्थ्यशाली बनविण्याचे स्वप्न बघणारे व ते पूर्णत्वास नेण्यासाठी अथक व अविरत परिश्रम करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या निःस्वार्थी सेवाकार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपच्या वतीने संपूर्ण देशात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यामाध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविल्या जात आहेत.__विविध सामाजिक व लोकोपयोगी उद्दिष्ट्ये साध्य करीत भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मा. सौ. उमाताई खापरे, मा. जिल्हाध्यक्षा सौ. सिंधुताई खेडेकर, लोकनेते तथा माजी आमदार श्री चैनसुखजी संचेती,सामाजिक कार्यकर्ते तथा शहराध्यक्ष श्री श्यामभाऊ राखोंडे व नांदुरा शहर भाजपा सरचिटणीस श्री नितिनभाऊ लहाने यांच्या मार्गदर्शनात व ज्येष्ठ समाजसेविका तथा शहराध्यक्षा सौ. सारिकाताई डागा यांच्या संकल्पनेतुन नांदुरा शहरामध्ये विविध समाजाभिमुख व कल्याणकारी उपक्रम* राबविले जात असून या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लाभ होऊन सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे.__याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सामाजिक जाणिवांचा विस्तार करीत आज शनिवार अंबादेवी गडानजीक शालेय अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना टिफिन्स, बॉटल्स आदींसारख्या आवश्यक साहित्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. याप्रसंगी मा. सौ. सारिकाताई डागा व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांशी विविध शालेय व शैक्षणिक बाबींवर चर्चा करून शालेय कामकाज जाणुन घेतले. पुढील काळातही विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे सेवा देण्यासाठी तत्पर राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.__यावेळी बेटी बचाव-बेटी पढाव संयोजिका सौ. ज्योतीताई तांदळे,भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा सौ. जयश्रीताई पिंपरे, ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. शोभाताई देशमुख आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन सौ. मंगलाताई बोदडे यांनी केले._
Users Today : 15