दिपक मापारी, रिसोड वृक्षारोपन व माजी रा.से. यो स्वयंसेवक यांचा केला सत्कार.. श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथे 53 वा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा चे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर वाहाने तर प्रमुख मार्गदर्शक माजी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दिपाली देशमुख, प्रा.डॉ . जयश्री काळे कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. भारती देशमुख व प्रा. विजय वानखेडे उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यात उत्स्फूर्त सहभाग घेणारे M.S.W-ll राष्ट्रीय सेवा योजनेची माजी उत्कृष्ट स्वयंसेवक प्रदीप पट्टेबहादूर व कु .मयुरी अवताडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या मार्गदर्शक प्रा. दिपाली देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची ध्येयधोरण विद्यार्थ्यांना स्पष्ट केली. प्रा.जयश्री काळे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्र विकासात NSS योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वाहाने सर यांनी Not me but you हे ब्रीद किती समर्पक आहे. आपण समाजपोयोगी कार्य करावे असे आवाहन केले .स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपणाचा करून कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्यांमध्ये साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रुती इंगळे हिने केले. तर आभार प्रदर्शन मंगेश बळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले..
Users Today : 27