पातुर येथे शांतता समितीची सभा संपन्न जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या हस्ते .

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर दिवंगत होत असलेली परंपरा कायम ठेवत पातुर शहरातील तरुण युवकांनी व्यायाम शाळा प्रदर्शन माध्यमातून कायम ठेवल्याने ॲडिशनल एस पी मोनिका राऊत यांनी मुलांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविंत्य केले यावेळी सिदाजी व्यायाम शाळा, खडकेश्वर व्यायाम प्रसारक मंडळ, संभाजी ग्रुप प्रतिष्ठान, लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, जय भवानी गणेश उत्सव मंडळ, पातूर शहरातील पत्रकार व सामाजिक संघटनांना प्रशस्तीपत्र देण्यात आले

पातूर शहरात गणेश उत्सव डीजे मुक्त साजरा करण्यात आला या वर्षी अनेक गणेश मंडळानी पारंपारिक वाद्य व व्यायाम शाळा ला जास्त भर दिला या धार्मिक व पारंपारिक पद्धतीने झालेला गणेश उत्सव प्रशासनाला आवडले आहे त्या अनुषंगाने पातुर पोलीस प्रशासनाकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले आगामी सण उत्सव दरम्यान पातुर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी सभेदरम्यान येणाऱ्या शहरातील दुर्गा उत्सव तसेच धम्म परिवर्तन, नवरात्री दसरा उत्सवानिमित्त ,व ईद निमित्त सभा संपन्न झाली सभेला अकोला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील व ग्रामीण भागातील पोलीस पाटील, पत्रकार, अकोला पोलीस बॉईज असोसिएशनचे सदस्य, होमगार्ड असोसिएशन, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व व्यायाम शाळेच्या तरुण युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली यादरम्यान श्री सिदिजी व्यायाम शाळेचे मल्ल, व खडकेश्वर व्यायाम शाळेचे मल्ल यांनी लेझीम, लाठी,काटी, व शहिदांच्या आठवणी जाग्या करून उपस्थितांची मन जिंकली या तरुण युवकांना योग्य मार्गदर्शन करण्याकरिता पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांनी युवकांना दिवंगत होत असलेल्या व्यायाम शाळांना पुनर्जीवित करण्याकरिता व्यायाम शाळेतील परंपरागत जुन्या रुढी कायम ठेवण्याचे आवाहन केले होते त्यांच्या या आव्हानाला साद देऊन पातुर शहरातील सिदाजी महाराज व्यायाम शाळा खडकेश्वर व्यायाम शाळा चे मुख्य पैलवान चंदू पैलवान वानखडे, पैलवान सुरेश श्रीनाथ, पैलवान श्रीकृष्ण फुलारी, पैलवान डिगांबर उगले, पैलवान बालु बगाडे, बजरंगी मंगेश गाडगे, यांनी या व्यायाम शाळेतील युवकांना सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवकांना व्यायाम शाळेचे धडे दिले, यावेळी पातुर शहरातील मराठी पत्रकार संघ चे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार शंकररावजी नाभरे ,मोहन जोशी, उमेश देशमुख, प्रदीप काळपांडे, किरण निमकंडे, व साहित्यिक पत्रकार देवानंद गहिले , निशांत गवई, दूल्हे खा युसुफ खान, स्वप्निल सुरवाडे , प्रमोद कढोणे, निखिल इंगळे, रामेश्वर वाढी , संगीता इंगळे, तसेच पातुर शहरातील माजी नगराध्यक्ष हिदायत खा रुम खा उर्फ ईंदु पैलवान, महताब पैलवान, लोकसेवा बिछायत केंद्राचे प्रकाश निमकंडे, बंडू देवकर , गजानन गाडगे, शेख मुख्तार,मंगल डोगरे, पातूर शहरातील दुर्गा उत्सव मंडळ नवदुर्गा उत्सव मंडळ गुजरी लाईन, पिंपळेश्वर दुर्गा उत्सव मंडळ अध्यक्ष,पातुर तालुका विकास मंच चे ठाकूर शिवकुमार , पातुर शहर पोलीस पाटील बंडु कढोणे , तसेच पातुर शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हर्षल रत्नुपारखी, मंजीत पठाण, ,pi सोनवणे मॅडम, भवाने मेजर, वसंत राठोड, इतर पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गवई मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीता इंगळे यांनी केले.

 

0 9 4 5 5 9
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *