मुंबईत दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार :- जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार :- शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला नंदुरबार जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईत जाणार आहेत. नियोजनासाठी काल रविवारी राम पॅलेस वर बैठक आयोजित करण्यात आली होती मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार असून, हजारो संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.     सत्तांतरानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या यंदा पहिला दसरा मेळावा दि. 5 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे.राज्यभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून देखील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.काल रविवारी शिवसेनेचे नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी नंदुरबार तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी माजी आ.रघुवंशी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईमध्ये बीकेसीत दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे. मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.

 

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *