बिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू..

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार –:खांडबारा रस्त्या वरील बिज्यादेवी गावा जवळ घडलेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे .    या बाबत अधिक माहिती अशी की , नंदुरबार – खांडबारा रस्त्यावर बिज्यादेवी गावाजवळील हॉटेल आदित्यजवळ काल दि . २४ सप्टेंबर रोजी ७. १५ मिनीटांनी ट्रॅक्टर ( क्र.एम.एच .१ ९ -४ ९ १८ ) व मोटरसायकलचा अपघात झाला . यात बिज्यादेवी येथील दिलीप सुदाम देसाई ( ३ ९ ) रा . बिज्यादेवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ( १०८ रूग्ण वाहिकेने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .     दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर त्याठिकाणी पोलीसांना उशिरा माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी पोहचू शकले नाही . त्यानंतर सुमारे ८.४० वाजेच्या दरम्यान अपघातग्रस्त ट्रॅक्टर तसेच उभे असल्याने त्यावर मोटर सायकलस्वार आदळून दुसरा अपघात घडला .    या अपघातात रेल्वे कर्मचारी लक्ष्मण बाजीराव कोकणी ( ३० ) रा . झामटयावड ( ता . नवापूर ) यांना दुखापत झाली . उपचारा दरम्यान या युवकाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली . एकाच ठिकाणी अपघात झाल्या नंतरही त्याठिकाणाहून ट्रॅक्टर हटविण्यात आले नसल्याने युवकाला आपला प्राण गमवावा लागला . असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे .   दरम्यान दोन अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी सदर अपघातग्रस्त ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे .

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *