प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: नवापूर तालुक्यातील देवमोगरा येथे दारूच्या नशेत घरगुती भांडणावरून गळा आवळून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे . या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नवापूर तालुक्यातील देवमोगरा येथे अविनाश जेमा पाडवी हा दारूच्या नशेत असतांना त्याची पत्नी टिना पाडवी हिचा सोबत भांडण झाले . याचा राग येवून घरगुती भांडणाचा कारणावरून अविनाश पाडवी याने टिना अविनाश पाडवी ( ३३ ) हिचा गळा आवळून पाठीवर चेहऱ्यावर दोन्ही पायांवर मारहाण करून तिला जिवेठार केले . या प्रकरणी गुलाबसिंग भामटया वसावा रा.करोड ( ता.उच्छल , गुजरात ) यांच्या फिर्यादी वरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अविनाश जेमा पाडवी रा . देवमोगरा ( ता.नवापूर ) याच्या विरूध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे करीत आहेत .
Users Today : 15