तर्पण अर्पण साधले
सरे अवस सर्वं पित्री
नव उत्साहां घेऊनि
आलीआली नवरात्री
घरोघर घटस्थापना
उर्जा सळाळी गात्री
पहिली माळ गुंफता
पुजा माता शैल पुत्री
वृषभारूढ मा शोभे
भक्तवत्सल प्रेम नेत्री
हिमगौरी आदिशक्ती
राहते रे कैलास क्षेत्री
धवल रंग प्रिय तिला
वहावी फुले बेल पत्री
भक्ता सावरे सांभाळे
धरे अद्रृश्य कृपाछत्री
त्रिशूल असे एकहाती
असूरा वधाया गायत्री
कमल असे दुजे हाती
मन निर्मळते सावित्री
दिवस रात्र मंतरलेले
सुखे भारावेल धरित्री
महोत्सव करता मात्र
हवी निर्मळता चरित्री
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996
www.kavyakusum.com
Users Today : 1