माणसाच्या आयुष्यात, त्याच्या जगण्यात ” मेहनत” हा शब्द खुपच महत्त्वाचा आहे. जीवन जगण्यासाठी, आपलं पोट भरण्यासाठी, घर सांभाळण्यासठी, पैसा हा लागतोच, प्रत्येक माणसाला आपल्या जवळ पैसा, खुप संपत्ती असावी वाटतं अगदी सामान्य माणसापासुन ते खानदानी श्रीमंत माणसांपर्यंत, कोणी आपलं दैनंदिन जीवन जगण्यासाठी पैसा कमावतो, तर कोणी त्यापलीकडे जावून सर्व गरजा भागवून पैसा, संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करतो.
कोणी त्यासोबतच आपलं नाव देखील कमवत असतो, पण या सर्व गोष्टीमागे म्हणजेच या बाबी साध्य होण्यासाठी मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, काय महत्वाचं आहे, ते म्हणजे मणापासून करावी लागणारी ” मेहनत” होय.
मेहनतीशिवाय जगण्याला महत्त्व नाही, मेहनत ही सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून येते, मेहनतीशिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं कार्य साध्य करणं हे अवघडचं आहे. ” मेहनत” छोटी असो वा मोठी करावी तर प्रत्येकालाच लागणार आहे. आणि जसी ” मेहनत” असेल तसेच फळ प्रत्येकालाच मिळेल, ” मेहनतीचं फळ” म्हणतात ना हे तेच आहे जे मनापासून केलेल्या कार्यातून काहीतरी म्हणजेच त्या कार्याप्रमानेच थोडं या जास्ती चांगलं आनंददायी आपल्या मनासारखं मिळते.
” मेहनत” म्हणायची कशाला, मेहनत म्हणजे काय ? प्रत्येकाच्या नजरेत ” मेहनत” ही वेगळी आहे. काहीजन विशिष्ट कार्यालाच ” मेहनत” म्हणतात, तसं, खोलवर पाहिलं तर “मेहनत” ही ” शारिरीक मेहनत आणि दिमाकी ( बोद्धिक) मेहनत या जगात आहेत. परंतु, सर्वांच्या परिचयाची खुप जनांच्या मनाची
“मेहनत” म्हणजे ” शारिरीक मेहनत होय. आणि खासकरून सर्वत्र ” शारिरीक मेहनतच आहे, आणि या एकमेव मेहनतीलाचा आपल्या देशांमध्ये मेहनत मानली जाते. या शारिरीक मेहनतीमधून माणूस पैसा कमावतो दैनदिन गरजा भागवतो, परंतु, एखादी सामान्य व्यक्ती शारिरीक मेहनतीमधून मोलमजुरी करून श्रीमंत होणं हे कमीच आहे. सामान्य व्यक्ती देखील श्रीमंत होऊ शकतात पण शारिरीक मेहनतीलाच ” दिमाकी ( बौद्धीक) मेहनतीची” जोड द्यावी लागते.
पण जास्ती तरी सर्वसामान्य व्यक्तींना शारिरीक मेहनतच माहिती जास्ती प्रमाणात आहे, ” दिमाकी ( बौद्धिक) मेहनतीपासून ते खुपच दुर आहेत, त्यांना कोणी दिमाकी मेहनतीबद्दल सांगितल तर सांगणऱ्यावरतीच हसतात असं कुठ असतं का म्हणतात, ते दिमाकी मेहनतीवरती थोडा देखील भरोसा करित नाहीत, ” मेहनत” हे फक्त शारिरीक मेहनतीलाचा म्हणतात, पण या जगामध्ये खासकरून आपल्या देशांमध्ये देखील जास्ती दिमाकी ( बौद्धिक ) मेहनत करून पैसा, संपत्ती, नाव कमावतात आणि त्यात श्रीमंती त्यांच्या वाटेला येतेय. दिमाकी मेहनतीला शिक्षणाची देखील तेवढीच जोड आहे.
सर्वसामान्य माणूस शारिरीक मेहनती मधून पैसा तरी कमावतो, गरजा भागवतो आणि शिल्लक राहिलेला पैसा बचत म्हणून ठेवून देतो भविष्यातील अडचणींच्या वेळी कामी यावं म्हणून, पण तो पैसा काही वाढत नाही जितका ठेवला तितकाच राहतो. घरांमध्ये काही कार्यक्रम आला किंवा थोड्या मोठ्या खर्चाचा दवाखाना लागला तर तो जमवलेला सर्व पैसा त्यात संपून जातो, परत आणखी जशास तसे अशी हालात होते आर्थिक बाबतीत, तसं जीवन जगताना सर्व गोष्टी जगत असताना पैसा खर्च होतोच आणि ज्या गोष्टीसाठी पैशाची गरज असते त्यासाठी पैसा खर्च केलाच पाहिजे, पण या सर्व गोष्टी करत असताना जर ” श्रीमंत” कोणाला बनायच असेल तर ” दिमाकी ( बौद्धिक ) मेहनत ही महत्त्वाचीच आहे, मला वाटत सर्व सामान्य व्यक्तीची श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर, ” शारिरीक मेहनतीमधून कमावलेला पैसा जो बचत करून ठेवतो, तो पैसा तसाच वर्षानुवर्षे न ठेवता त्याच पैशातून दुसरा पैसा कसा वाढवावा याचा विचार केला पाहिजे, त्या पैशाची योग्य त्या वेळी योग्य त्या ठिकाणी दिमाकी ( बौद्धिक ) मेहनतीचा वापर करून तो पैसा गुंतवला पाहिजे, अशाच प्रकारे जगामध्ये खुप व्यक्ती पैसा कमावतात श्रीमंत होतात. अशा खुप गोष्टी आहेत जे की पैशातून पैसा कमवू शकतो , याची माहिती सर्वसामान्यांनी देखील घेतली पाहिजे पैसा , संपत्ती वाढवू शकतो आणि श्रीमंती आपल्या देखील वाट्याला आणु शकतो, पण ते कसं शारिरिक मेहनतीसोबतचं दिमाकी ( बौद्धिक ) मेहनत देखील करावीच लागेल..!!
श्रीमंतीची आस आहे
सर्वांच्या घरातील मनात….
पैशाचं योग्य ते नियोजन
आणेल श्रीमंती घरात..!!
Users Today : 1