एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांना प्रोत्साहन व अर्थसहाय

Khozmaster
1 Min Read

अकोला – फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन व प्रक्रिया करुन शीतगृहांमध्ये साठवणूक करुन फलोत्पादन पिके व पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध व्हावा याकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांना प्रोत्साहन व अर्थसहाय दिले जात आहे. त्यात एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांची उभारणीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. उत्पादित फलोत्पादन, औषधी, सुंगधी मालाची साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करुन दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे तसेच मोठया प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून योग्य बाजारमुल्य शेतकऱ्यांना मिळवूण देण्यासाठी काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांना प्रोत्साहन व अर्थसहाय्य दिले जाते. या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्थसहाय योजनासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणेचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी केले.

0 9 4 5 5 9
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *