भाजपा आकोट तालुक्याच्या वतीने पंडित दीनदयालजी उपाध्याय यांची जयंती साजरी

Khozmaster
2 Min Read

विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी- देशभरासह राज्यात,अकोला जिल्ह्यात खासदार संजयभाऊ धोत्रे, भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा अध्यक्ष,आमदार रणधीरभाऊ सावरकर जिल्हा संयोजक आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. याच काळात 25 सप्टेंबर ला प्रखर राष्ट्रभक्त व भारतीय जनसंघा चे अध्यक्ष,एकात्म मानववाद चे प्रणेते स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती विविध उपक्रम राबवून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. देवरीफाटा जवळील वेताळ बाबा संस्थान येथे जयंती निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सर्वप्रथम स्व.दीनदयाल जी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष प्रा अशोकराव गावंडे,राजू नागमते,जिल्हा चिटणीस मधुकरराव पाटकर,माजी सभापती विजयसिंग सोळुंके,जी प सदस्य प्रकाशभाऊ आतकड,प स सदस्य संतोष शिवरकार, प स सदस्य राजूभाऊ येउल,प स सदस्य नितेश तायडे,आत्मा समितीचे माधवराव बकाल,ग्राममंडळा चे अध्यक्ष किशोर बुले,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मावलकर,अभियान चे संयोजक दत्तू पाटील गावंडे,गोपालभाऊ रावणकर,तालुका सरचिटणीस किशोरभाऊ सरोदे,सरचिटणीस विठ्ठल वाकोडे,डॉ मनोहरराव चाकोते,प्रवीण डीक्कर,सरपंच शिवाजीराव सपकाळ,ज्ञानेश्वर आढे,हे उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक गोपाल रावणकर यांनी केले.राजेश नागमते,अशोकराव गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी स्व पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. दीनदयालजी यांच्या एकात्म मानववाद,अंत्योदय,सेवा,या बाबत व धोरणाची माहिती दिली.या प्रसंगी गजाननभाऊ यादव मनोज खंडार,राजू भाऊ गायकवाड,शशिकांत तराळे,संजय बोन्द्रे,गजाननभाऊ थोरात,पुरुषोत्तमभाऊ सिरसाट,विष्णू पाटील,श्रीकृष्ण सासनकर, अजय खडसान,महादेव कवळकार, शेषरावजी मोडक,रामकृष्णजी भगत,नामदेवराव कुलट, सुनील भोंगळ, एकनाथ पाटील वानखडे,रूपेश कोल्हे,प्रशांत ओळंबे,अनिल इंगळे, नितीन गोंडचवर,जगन्नाथपाटील राठोड,मनोहर गावंडे,संतोष गावंडे,विनोद साबळे, विठ्ठलराव ठोकळ, प्रकाश डामरे,ओंकार बेंडे,समाधानभाऊ येरोकार, विनोद इसेकार,शुभम लोणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी,शक्ती केन्द्र प्रमुख,बूथ प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन गजाननभाऊ नळे यांनी केले आभार दत्तू पाटील गावंडे यांनी मानले.

0 9 4 5 5 9
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *