शिवसेना महिला आघाडी नांदुरा कडुन नवरात्र उत्सवानिमित्त शहरात राबविले स्वच्छता अभियान!

Khozmaster
2 Min Read

_नांदुरा प्रतिनिधि (शुभम ढवळे) घटस्थापनेच्या मंगल औचित्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. नवरात्रीचे नऊ दिवस मोठ्या हर्ष-उल्हासाने पार पडतात, याच औचित्याने आपण माझे घर’ म्हणून आपल्या घराची स्वच्छता करतो त्याचप्रमाणे आपण सर्वांनी जर माझे गाव’ म्हणून आपला परिसर सुद्धा स्वच्छ केला तर आपले गाव-शहर स्वच्छ होऊन आपला देश ‘भारत माझा देश आहे’ या उक्तीप्रमाणेच परिपूर्ण होईल. स्वच्छतेचे महत्त्व फार अनमोल आहे अनेक संतांनी आपल्या अभंगातून, किर्तनातून ओव्यांतून आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे, म्हणूनच *शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहर* यांच्याकडून नांदुरा खुर्द येथील परिसरात आज सोमवार दि. २६/०९/२०२२ रोजी पहाटे स्वछता अभियान राबवण्यात आले. वंदे मातरम चौक पासुन स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली प्रभात चौक, श्री.बालाजी चौक भावसारमाता मंदिर परिसर, दरबार गल्ली, लेवा पंचमळी परिसर, हनुमान चौक (वेस), विठ्ठल मंदिर परिसर या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नांदुरा खुर्द येथील विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळाच्या काही महिला शिवसेना महिला आघाडीकडुन प्रेरीत होऊन स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाल्या व शिवसेना महिला आघाडीला आपले विशेष श्रमदान दिले. या महिलांप्रमाणेच नांदुरा शहरातील इतरही महिला प्रेरित होऊन नवरात्री च्या नऊ दिवसात नऊ रंगांच्या नऊ साड्यांना महत्व न देता इतर जनहिताचे उपक्रम राबवतील अशी अपेक्षा शिवसेना महिला आघाडीच्या नांदुरा शहर प्रमुख सौ. सरिताताई बावस्कार यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. आज घटस्थापनेच्या दिवशी स्वच्छता अभियानात सर्वांनीच आपले योगदान दिले.यावेळी सौ. सरिता प्रकाश बावस्कार, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख_

सौ.अनुराधाताई मधुकर नवले.सामाजिक कार्यकर्त्या, सौ. लीलाताई डिवरे शिक्षिका,सौ. नंदाबाई डवंगे, सौ.उषाताई बावस्कार, सौ.राखोंडेताई

कु. रुचिका रंभाडे, कु. गायत्री डवंगे कु.हिंदवी बावस्कार व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

 

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *