अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नाने हरवलेला बालक पालकांच्या स्वाधीन

Khozmaster
2 Min Read

 

अकोला – नागपूर येथून हरवलेला 14 वर्षीय बालकास शनिवार दि. 10 सप्टेंबर रोजी अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. अकोला रेल्वे स्थानकावर चाईल्ड लाईनच्या टीमला हा बालक भटकतांना निर्देशानात आला. या बालकास विचारपूस करुन बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार शासकीय बालगृह, अकोला येथे दाखल करुन त्याचा सांभाळ करण्यात आला.
संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली की, अकोला रेल्वेस्टेशन येथे (दि.25 एप्रिल रोजी) 14 वर्षीय बालक भटकताना निदर्शनास आला. रेल्वे स्टेशन येथील चाईल्ड लाईनच्या टिमने या बालकास विचारपूस केली मात्र तो काही सांगण्यास तयार नोव्हता. केवळ ‘घर को नही जाना है’ असे वारंवार सांगत होता. त्याच्या बोलीभाषेवरुन तो हिंदी भाषीक होता. या बालकाचे कुटूंब शोधण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध कार्य सुरु करण्यात आले. या कालावधीत हरविलेल्या बालकास वर्ग सहावीमध्ये दाखल करण्यात आले. यादरम्यान बालगृहामधील बालकांना संत्री वाटप करताना या बालकाने ‘हमारे नागपूर की संत्री प्रसिद्ध है’ असे उद्गार काढले. त्याच्या या वाक्यानी बालगृहातील अधीक्षीका जयश्री वाढे व समुपदेशक नंदन शेंडे यांनी बालकाला विश्वासात घेत विविध माध्यमातून त्याचा घराचा पत्ता माहिती करुन घेतला. या पत्त्यावर नागपूर येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व समुपदेशक अनिल शुक्ला यांनी भेट देऊन शोध घेतला. परंतु बालकाच्या पालकाचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर समुपदेशक नंदन शेंडे यांनी व्हिडीओ कॉलव्दारे बालकाने सांगितलेल्या भाग दाखविण्यात आला. त्या बालकाने लगेच या भागात राहत असल्याबाबत सांगितले. व्हिडीओमध्ये दाखविलेल्या भागाचा अचूक माहितीनुसार समुपदेशक अनिल शुक्ला यांनी त्यांच्या आईवडीलाचा शोध घेतला. बालक व त्यांच्या आईवडीलाशी व्हिडीओ कॉलव्दारे प्रत्यक्ष दाखवून ओळख पटविण्यात आली. हरविलेल्या बालकाचा चेहरा दिसताच त्यांच्या आईवडिलांचे आनंदाश्रू अनावर झाले.
हा बालक गेल्या सहा महिण्यापासून परिवाराच्या संपर्कात नव्हता. अखेर सर्व सोपस्कार पूर्ण करुन बालकल्याण समितीच्या आदेशानुसार या बालीकेला दि. 10 सप्टेंबर रोजी त्याच्या वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला व नागपूर तसेच शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, चाईल्ड लाईन यांच्या प्रयत्नाने हरविलेल्या बालीकाला आईवडीलांचे वात्सल्य पुन्हा मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *