नंदुरबार -:शहरातील डीएसके मार्केट समोरील पार्किंग मधून चोरट्याने दुचाकी लंपास केली . या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर तालुक्यातील केलपाडा येथील शमुवेल नानसिंग वळवी यांच्या मालकीची दुचाकी ( क्र.एम.एच .३ ९ के ५२२० नंदुरबार शहरातील डीएसके मार्केटसमोरील पार्किंगमधून चोरट्याने चोरुन नेली . या बाबत शमुवेल वळवी यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोना . अरविंद पाडवी करीत आहेत .
Users Today : 43